२२. पांच दिवस उत्सव केला निवृत्तिसी

पांच दिवस उत्सव केला निवृत्तिसी । काला आमावस्येशी त्र्यंबकेश्वरीं ॥ १ ॥
प्रतिपदेसी हरि निघाले बाहेरी । कीर्तन गजरी पुढे होत ॥। २ ॥
कांही ऋषीश्वर राहियेले तेथें । गेले ते बहुतेक अलंकापुरा ॥ ३ ॥
गरुडावरी सिद्ध झाले नारायण । चाललीं विमानें गंधर्वांचीं ॥ ४ ॥
नामा म्हणे देवा जावे आषाढीसीं । आले एकादशी पंढरीये ॥ ५ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *