२३. जयजयकारें टाळी पिटीती सकळी

जयजयकारें टाळी पिटीती सकळी । चालली मंडळी वैष्णवांची ॥ १ ॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेरी । कीर्तन गजरी पुढें होत ॥ २ ॥
विठोबा रखुमाई बैसली गरुडावर । केला नमस्कार वैष्णवांनी ॥ ३ ॥
म्हणती तीर्थयात्रा झाली यथासांग । पाहिले प्रसंग समाधिचे ॥ ४ ॥
गेले योगिराज अनादि जे आदि । राहिल्या त्या समाधि जगामाजी ॥ ५ ॥
नामा म्हणे देवा गेले मुनिजन । राहिलें तें ज्ञान जगामाजी ॥ ६ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *