२८. समाधि श्रवण करिती निशिदिनीं
समाधि श्रवण करिती निशिदिनीं । त्यांसी चक्रपाणी देईल भेटी ॥ १ ॥
समाधिश्रवणाचा धरील जो विश्वास । नाहीं नाहीं दोष पातकांचा ॥ २ ॥
समाधि विरक्ताची पतिताला वाराणशी । कोटि कुळें त्यासी उद्धरील ॥ ३ ॥
जो कोणी बैसेल समाधिश्रवणा । तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे ॥ ४ ॥
स्वहित साधन सांगितलें येथ। परिसा भागवत लेखकु जाहला ॥ ५ ॥
नामा म्हणे हरि बोलिलो तुझिया बख । वाहिलीं तुलसीदळें स्वामीलागीं ॥ ६ ॥