३५८. पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरीं
पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरीं । नाही चराचरीं ऐसा कोणी ॥ १ ॥
विष्णुसहित शिव आणिला पंढरी । केलें भीमातीरीं पेखणें जेणें ॥ २ ॥
ब्रह्मादिकां अंत न कळे ज्या रूपाचा । एवढी कीर्ति वाचा बोलों काय ॥ ३ ॥
निवृत्ति सांगे मातु विठ्ठल उच्चार। वैकुंठ उत्तरे एक्यानामे ॥ ४ ॥