३६६. वेदादिक सम गुरुगम्य पार
वेदादिक सम गुरुगम्य पार । तोचि हा साचार गुरू उपदेशु ॥ १ ॥
नाहीं येथ दुजे सर्व हरिराजे । गोपाळ सहजें विस्तारला ॥ २ ॥
। दुजेपणा कांहीं नियम निस्सीम । सदोदित राम पूर्णपणे ॥ ३ ॥
निवृत्ति उपदेशु ज्ञानासी सोहपा । सोपान मंडपा विरहीत ॥ ४ ॥