३६८. सर्व परिपूर्ण भरलेंसे अखंड

सर्व परिपूर्ण भरलेंसे अखंड । त्यामाजि ब्रह्मांड अनंत कोटि ॥ १ ॥
आपणचि देव आपणचि भक्त । आपण विरक्त सर्व जाला ॥ २ ॥
अनंत संकेत जीवशिवरत । मागुतें भरत सिंधु तोये । ३ ॥
निवृत्ति म्हणती तेथीचे हे अंश । साधक विश्वास गयनिराजे ॥ ४ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *