३७२. विवरण सार हरिहर आप
विवरण सार हरिहर आप। सर्व हरिरूप आपणपणें ।। १ ।।
आपरूपें गोविंद गोंविला सगळा । चरण कमळा विनटलों ।। २ ।।
भिन्न दुजें लाटे मन उफराटें । उन्मनिये वाटे भेदियेलें ॥ ३ ॥
निवृत्ति गोल्हाट मार्ग तो सपाट । भेदुनि त्रिकुट साधियेलें ॥ ४ ॥