३७४. मोडिला तो खेळ तोडियेलें सूत्र

मोडिला तो खेळ तोडियेलें सूत्र । टाकिलें परत पैल रूप ।। १ ॥
रूपे केला गोड वासना मवाळ । जिव्हेसी वाचाळ हरी आला ॥ २ ॥
शोधिलें जीवन निक्षेपिलें धन । मनोमय जाण हरी जाला ॥ ३ ॥
निवृत्ति गयनी ध्येय ध्याता ज्ञानी । अखंड निशाणी समनामीं ॥ ४ ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *