३७७. सर्वरूपें हरी ऐसें मन करी
सर्वरूपें हरी ऐसें मन करी । वासना प्रहरी नामपाठें ॥ १ ॥
रामकृष्ण वाड सर्व है वैकुंठ । दिसेल प्रकट निजरूपे ॥ २ ॥
व्रत तप तीर्थ नाम हे अनंत । माजि सामवत आत्मनाथीं ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणें ते नाम रामवदे जप । फळले संकल्प रामनामें ॥ ४ ॥