०७७ निरोपम गगनीं विस्तारलें एक

निरोपम गगनीं विस्तारलें एक ।
अनंत हे ठक गणना नाहीं ॥ १ ॥
तो माय सांवळा यमुनेचे तटीं ।
कृष्ण तो जगजेठी यशोदेचा ॥ २ ॥
निराकृति आकार अंकुर गोमटे ।
तो गोपिकांसी भेटे भाग्ययोगें ॥ ३ ॥
निवृत्ति संपन्न कृष्णरूप ध्यान ।
गयनी तल्लीन नाम घेतां ॥ ४ ॥

सरलार्थ:

उपमारहित महाकाशांत हे एकच व्यापलेले आहे. पण हे एकच हि अनंत आहे. याची संख्याच करता येत नाही असे हे फसवे आहे असून ।।१।। अग बाई तो जगात श्रेष्ठ असा यशोदेचा सावळा कृष्ण यमुनेच्या तिरावर आहे ।।२।। आकार रहित अवस्थेत हा चांगल्या आकाराने अंकुरला आहे व गोपींच्या महान भाग्याने त्यांना लाभला आहे ।। ३।। त्या श्रीकृष्ण ध्यानाने निवृत्ति परिपूर्ण आहे. ज्याचे नाम घेत असता तो सद्गुरू गयनी देखील स्वरूपात एकरूप होतो ।।४।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *