१०८ अनंत रचना हारपती ब्रह्मांडे

अनंत रचना हारपती ब्रह्मांडे ।
हेळाचि वितंडे मोडीतसे ॥१॥
तें रूप राजस वसुदेव भोगी ।
देवक्रियेलागी वोळलेंसे ॥२॥
विचित्र रचना ब्रह्मांड कुसरी ।
निरालंब हरि गोकुळीं वसे ॥३॥
निवृत्ति संपदा गाताती गोविंदा ।
भोगिती मुकुंदा निजबोधे ॥४॥

सरलार्थ:

ब्रह्मांडाचे असंख्य आकार जेथे नाहिसे होतात. ती प्रचंड व विशाल अशी ब्रह्मांडे क्षणातच तो मोडून टाकतो. ।।१।। ते राजस- आकर्षक रूप वसुदेवाने भोगले व देवकीसाठीहि ते प्रगट झाले आहे ।।२।। त्या ब्रह्मांडाची चातुर्याने केलेली चित्रविचित्र रचना करणारा स्वावलंबी श्रीहरि गोकुळांत राहत आहे ।।३।। निवृत्तिची संपत्ति अशा गोविंदाचे, गोकुळातील गोप गोपी गुणगान गातात व आत्मबोधाने श्रीमुकुंदाचा भोग घेतात, आत्मत्त्वाने आनंद भोगतात ।।४।।

भावार्थ:

अनंत जगाची रचना तो करतो व त्याच्याच ठिकाणी त्या जगताचा लय होतो. त्याच रुपाने देवकीच्या उदरातुन जन्म घेतला व वसुदेवाने पिता होण्याचे सुख.त्याच रुपाने आधी विविध रुपात जगताची निर्मीती केली व नंतर कृष्ण बनुन तो गोकुळात अवतरला. निवृत्तिनाथ म्हणतात, मी माझ्या बौध्दिक संपदेने त्या गोविंदाचे वर्णन गाऊन त्याच्या मुकुंद स्वरुपात आत्मबोधाचा आनंद घेत आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *