१७७ परम समाधान परमवर्धन

परम समाधान परमवर्धन ।
नाम जनार्दन क्षरलें असे ॥ १ ॥
अक्षर अनंत क्षर हा संकेत ।
मागुतें भरत आपण्यामाजी ॥ २ ॥
आपण क्षरला आपण उरला ।
वैकुंठी वसिन्नला चतुर्भुज ॥ ३ ॥
निवृत्तिगुरुगयनी सांगितलें हरि ।
नाम चराचरीं विस्तारलें ॥ ४ ॥

सरलार्थ:

गुरु गहिनीपासून आलेले हे जनार्दन श्रीहरिचे नाम श्रेष्ठ समाधान असून तेच सर्वश्रेष्ठ असे धन आहे ॥१॥ न क्षरणाऱ्या अनंतातून हा नाम संकेत निघतो व नंतर पुनः आपल्यामध्ये विलीन होतो ।।२।। आपणच पाझरतो व आपणच शिल्लक राहतो व वैकुंठात चतुर्भुज रूपे वसती करून राहतो ।।३।। गुरूगहिनी निवृत्तिस सांगतात की हरिनाम हे चराचर विश्वात पसरले आहे ।।४।।

भावार्थ:

ह्या अभंगात आलेले रुपक मागच्या अभंगतुन आले आहे. त्या संसार वृक्षाला मी तोडला व तो समुळ उखडला. त्यामुळे त्या प्रपंचाचा निरास झाला. त्या प्रपंच वृक्षाच्या संसार नावाच्या फुलातील विषय नावाचा भोग गेला तसेच हेत म्हणजे इच्छा ही राहिली नाही. त्यामुळे मी अखंडितपणे त्या गोपाळाबरोबर रत झालो. शिव व विष्णु हे एकरुप आहे हे जाणवल्यामुळे सर्व जगताच्या आकार व विकार ह्यांना मी सोडले. निवृत्तिनाथ  म्हणतात, गुरु गहिनीनाथांनी सांगितलेल्या नाम निधानामुळे भक्तांना नामामृताची प्राप्ती झाली.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *