१९९ द्वैताचीये प्रभे नसोन उरला

द्वैताचीये प्रभे नसोन उरला ।
निराकार संचला एकरूपें ॥ १ ॥
तें हें सांवळें स्वरूप डोळस ।
बाळरूप मीस घेतलेंसे ॥ २ ॥
तिहीं लोकीं दुर्लभ न कळे जीवशिवीं ।
तो आपणचि लाघवी मावरूपें ॥ ३ ॥
निवृत्तीचें सार जीवशिवबिढार।
रूनें निर्धार सांगितला ॥ ४ ॥

सरलार्थ:

दुसरेपणाची प्रभा नाहिशी करून तो शिल्लक राहिला आहे व निराकार एकरुपाने भरला आहे ।।१।। ते हे सावळेदेखणे स्वरूप असून त्याने बाळरुपाचे निमित्त केले आहे ॥२॥ तिन्ही लोकांत दुर्लभ असा तो जीव व शिवास – ईश्वरास कळला नाही तो आपणच मायारुपाने नटला आहे ।।३।। ते निवृत्तिचे सारस्वरूप जीव व शिवात वस्ती करून आहे. गुरूगहिनीने हा निश्चय सांगितला आहे ।।४।।

भावार्थ:

द्वैताच्या प्रभावातही ही तो निर्गुण परमात्मा भासमान होऊन उरला आहे. व निराकार असुन ही सर्व जगताच्या रुपातुन व्यापुन राहिला आहे. त्या निर्गुण रुपाने श्रीकृष्ण रुपी सगुण बालकत्व घेऊन अवतार घेतला आहे. तिन्ही लोक व जीव शिवाला न कळणारा परमात्मा आपल्या मायारुपाने सगुण लाघवी बाल स्वरुपात आला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जीव शिव चे सार ओझे खांद्यावर घेऊन मार्ग चालावा असे श्री गुरु गहिनी निश्चयात्मक सांगतात.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *