२३३ अनुभवाचे गांवी ज्ञान हेची फळ

अनुभवाचे गांवी ज्ञान हेची फळ । विज्ञान केवळ वृक्ष तया ।। १ ।।
साधनीं स्वानुभव अनुभवीं अनुभव । ब्रह्माची राणिव आम्हां घरीं ॥ २ ॥
रिकामा बरळु नसे खेळेमेळें । ब्रह्मची कल्लोळे भोगीतसे ॥ ३ ॥
निवृत्ति सरळ निरसले अज्ञान । सर्वत्र संपन्न आत्माराम ॥ ४ ॥

सरलार्थ:

आत्मानुभवांत आत्मज्ञान हे फळ असून प्रपंच ज्ञान हा वृक्ष आहे ।। १ ।। साधनाने स्वानुभव – आत्मानुभव व अनुभवाने महानुभव-ब्रह्मानुभव आमच्या जीवनांत आंता ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य आहे ।।२।। या ब्रह्मानंदात खेळत असता आम्ही निरर्थक बडबड करीत नाही. तर ब्रह्मानंदाच्या डोहावरील तरंगाचे सुखच आम्ही भोगत आहोत. ।। ३ ।। ज्ञानोत्तर प्रेमभक्तिचा विलासच निवृत्तीनाथांच्या अभंगातून दिसत आहे. निवृत्तिचे अज्ञान सहजच नाहिसे झाले आहे. व सर्वठिकाणी आत्मारामच भरला आहे ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *