२३७ न जाणती कळाकुसरी गोपाळा

न जाणती कळाकुसरी गोपाळा । नाम हें मंगळा अच्युताचें ॥ १ ॥
हेंचि मज द्यावे सप्रेम आपुलें । ध्यातुसे पाउलें एवढ्यासाठीं ॥ २ ॥
न मगे नेघे कांही याविण आणिक । सप्रेमाची भुक कृष्ण करी ॥ ३ ॥
समर्थाचे घरीं काहीं नाहीं उणें । अखंड प्रेम देणें कृष्णनामीं ॥ ४ ॥
इतुकेचि दातारा पुरवी माझें कोड । याविण काबाड भार नेघें ।। ५ ।।
निवृत्ति सप्रेम संजीवनी मूळ । स्मरतां काळ वेळ नाहीं नामीं ॥ ६ ॥

सरलार्थ:

कला कौशल्य हे काही भगवन्तास जाणत नाही अच्युताचे पवित्र नाम मात्र जाणते ।। १ ।। तेच आपले नाम मला प्रेमासह द्यावे. एवढ्या साठीच आपल्या पायाचे ध्यान करीत आहे ।। २ ।। या वाचुन मी दुसरे काही जाणत नाही व घेतही नाही फक्त प्रेमासहीत नाम मिळावे एवढीच भूक आणि तहान आहे ।। ३ ।। आपण समर्थ असून समर्थांचे घरी काहीच कमी नसते. म्हणून आपण मला कृष्णनामाचे ठिकाणी अखंड प्रेम द्यावे || ४ ।। अहो ! आपण महान दाते असून माझी एवढीच इच्छा पूर्ण करा. हट्ट पूर्ण करा. याशिवाय दुसरे कष्ट देणारे ओझे मी घेणार नाही ।। ५ ।। निवृत्ति सप्रेमयुक्त नाम हि संजीवन समाधी आहे. ते नामस्मरण करतांना कोणतीही काळ वेळ लागत नाही. ॥६॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *