२३९ जनीं जनार्दन हाचि भावो दृढ

जनीं जनार्दन हाचि भावो दृढ । अवघेंचि गुढ नारीं जना ।। १ ।।
जडमूढ तरती हरिनाम छंदें । एकानाम पद वैकुंठ रया ।। २ ।।
सत्वर उच्चार रामनाम चित्तीं । संसारखंती नाहीं तया ॥ ३ ॥
निवृत्ति सत्पद इच्छित सर्वदा । भिन्न भेद कदा नाहीं चित्तीं ॥ ४ ॥

सरलार्थ:

जनामध्ये जनार्दन असा दृढभाव स्त्रीया-पुरूषांना सर्वांगाने कठिण आहे. ।। १ ।। हरिनामाच्या आवडीने जडमूढ जन हे सर्वच तरून जातात. एका नामाच्या पदाने वैकुंठाचा लाभ होतो ।। २ ।। हरिनामाचा त्वरीत उच्चार केल्यानेच त्या चित्तात संसाराची काळजी राहत नाही ।। ३ ।। निवृत्ति त्या सत्पदाची सदैव इच्छा धरून आहे. त्यामुळे त्याच्या चित्तात भेदभाव केव्हाही नाही. सदा अभेद भावच नांदत आहे ।। ४ ।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *