२४७ नामानेनि बळे तरिजे संसार
नामानेनि बळे तरिजे संसार । आणिक विचार करूं नको ।। १ ।।
नाम जपे वेगीं म्हणे हरि हरि । प्रपंच बोहरि आपेआप ।। २ ।।
नित्यता भजन देवद्विज करी । नाम हैं उच्चारी रामनाम ।। ३ ।।
निवृत्ति जपतु रामनाम वाचे । दहन पापाचें आपेआप ॥ ४ ॥
सरलार्थ:
नामाच्या शक्तिने संसारातून तरुण जावे. अन्य दुसरा विचार करू नको || १ || हरि हरि असा नामजप वेगाने कर त्यामुळे आपोआपच प्रपंचबाहेर निघेल ||२|| नित्य भजन व देव ब्राह्मणाची सेवा करून व रामनामाचा उच्चार कर || ३ || निवृत्ति वाचेने रामनाम जप करीत आहे. त्यायोगे आपोआपच पापे जळून जातात ॥४॥