२४८ नलगे मंत्रसार न लगती तपे

नलगे मंत्रसार न लगती तपे । रामनाम सोहपें मूळ मंत्र ॥ १ ॥
रामनाम मंत्र जप तूरे मना । तुटेल यातना भवमूळ ।। २ ।।
ज्याचेनी स्मरणें तरली पैं गणिका । वैकुंठलोका प्राप्त जाली ।। ३ ।।
निवृत्ति म्हणे नाम सार हेंचि तप । जप कारे अमुप निरंतर ॥ ४ ॥

सरलार्थ:

अन्य सार मंत्र व तपांची आवश्यकता नाही. रामनाम हा मूळमंत्रच सोपा आहे. ।।१।। अरे जना तूं रामनामाचा मंत्र जपकर, तुझे संसार कारण व दुःखे नष्ट होतील. ।।२।। ज्याच्या नाम स्मरणाने जी वेश्याही तरली व ती वैकुंठास प्राप्त झाली ||३|| निवृत्ति म्हणतात नाम हेच सर्व तपाचे सार आहे. तू सतत असंख्य जप कर ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *