२४९ वेगु करी मना धरावे पै सार
वेगु करी मना धरावे पै सार । नामचि आचार रामनामें ॥ १ ॥
तरसीरे जना स्मरतां नामावळी । राहसि आढळीं वैकुंठी रया ।। २ ।।
सार तेंचि धरी असार तें निवडी । वैकुंठ चढोवढी रामनामें ।। ३ ।।
निवृत्ति म्हणे सिद्ध असतां पै मंत्र । रामनामें शत्रु नासतील ॥ ४ ॥
सरलार्थ:
अरे मना तूं रामनाम हे सार धर रामनामाने तुझा आचारच नाम होईल ॥ | १ || अरे जना तू राम नामावलीच्या स्मरणाने संसारातून तरून जाशील व वैकुंठात तुझे अढळ स्थान राहील ।। २ ।। ते साररूप नाम धर व असार ते बाजूला टाकून दे. या रामनामाने वैकुंठ हातोहात प्राप्त होईल. ||३|| निवृत्तिनाथ म्हणतात हा रामनाम मंत्र सिध्द असल्याने शत्रुंचा नाश होईल ।।४।।