२५० नामाचेनि स्मरणे नित्यता पारणे
नामाचेनि स्मरणे नित्यता पारणे । तेचि विठ्ठलनाणें पंढरीये ।। १ ।।
विठ्ठल विठ्ठल मंत्र हेंचि निजशास्त्र । विचारितां सर्वत्र दुजे नाहीं ॥। २ ॥
नामेंविण मर्ख नित्य पै तया दुःख । नामें शुकमुख नित्य सदा ।। ३ ।।
नामाचेनि स्मरणें नित्य पैं सुस्नात । दुजियाची मात नेणो आम्हीं ॥ ३ ॥
निवृत्ति जपतु अखंड नामावळी । हृदयकमळीं केशीराज ॥ ४ ॥
सरलार्थ:
ज्या नामाच्या चिंतनाने नित्यच समाधान प्राप्त होते ते विठ्ठल नामाचे रोकडे नाणे पंढरित आहे. ।।१।। विठ्ठल विठ्ठल हा मंत्र हेच आत्म्याचे शास्त्र आहे. सर्वांगाने विचार केला तरि विठ्ठलावाचुन दुसरे काहीच नाही. ।।२।। नामावाचुन मूर्ख असलेल्यास सदैव दुःख भोगावे लागते. नामाने नित्य मुख सुखरूप होते ।। ३।। विठ्ठलाचे नामस्मरण हा निवृत्तिचा जप आहे. विठ्ठलाच्या एका नामानेच कोटी पापाचा नाश होतो ।।४।।