२५१ राम नाम नित्य अखंड पै चिती

राम नाम नित्य अखंड पै चिती । तयाचे पुरती सर्व काम ॥ १ ॥
रामनाम नामें तुटती संसार । नाहीं त्या येरझार योनिमाळे ।। २ ।।
हरिध्यान आम्हां हाचि मंत्र थोर । न करी विचार अन्य शास्त्रीं ॥ ३ ॥
निवृत्ति अखंड जपतुसे नाम । हृदयीं सप्रेम मूर्ति त्याची ॥ ४ ॥

सरलार्थ:

ज्याच्या चित्तात अखंड राम नाम आहे. त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात ॥ १ ॥ रामनामाने सर्व संसार तुटतात व असंख्य योनि आणि येरझारा नष्ट होतात. ।।२।। आम्हाला हरिचे ध्यान हाच मोठा मंत्र आहे. तू अन्य शास्त्रांचा विचार करू नकोस ||३|| निवृत्ति अखंड नाम जपत असून त्याच्या हृदयांत प्रेमासह श्रीहरिची मूर्ती आहे. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *