२५४ परनिंदा झणी परपीडा जनी

परनिंदा झणी परपीडा जनी । नित्यता कीर्तनीं हरि जपे ।। १ ।।
उच्चार पापाचा विभाग ये त्याचा । वेगें हरि वाचा जपे रया ॥ २ ॥
दुजिया पीडणें द्वैत तेंचि जाण । अद्वैत ते खुण हरि एक ।। ३ ।।
निवृत्ति तटाक सर्व कृष्ण एक। अद्वैत हे लेख ब्रह्म सत्य ॥ ४ ॥

सरलार्थ:

कदाचित् दुसऱ्याची निंदा वा दुसऱ्यास दुःख देण्यापेक्षा नित्याने कीर्तनात श्रीहरिचा जप करावा दुसऱ्याच्या पापाचा उच्चार केला तर त्याचा वाटा आपणांसही भोगावा लागतो. म्हणून अरे राजा ? म्हणून त्वरित वाचेने हरिचा जप कर ।। २ ।। दुसऱ्यास पिडा देणे हेच व्दैत आहे. असे तूं समज एक हरि सर्वत्र आहे. असे समजणे हीच अव्दैताची खूण आहे. || ३ || सर्व एक कृष्णच आहे या तिरावर भूमिकेवर निवृत्ति असून एक ब्रह्मच सत्य आहे. हेच अद्वैताचे माप त्याचे जवळ आहे. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *