२६४ प्रल्हाद परिक्षिती ध्रुव बाळ म्हणती

प्रल्हाद परिक्षिती ध्रुव बाळ म्हणती । उपमन्यागति क्षीरसागरीं ।। १ ।।
भक्त हे तरले नामाचेनि बळें । कळिकाळासी खेळे दों अक्षरीं ।। २ ।।
आदि अंबऋषी भक्त निजसखा। दो अक्षरी लेखा केला तेणें ।। ३ ।।
उद्धव अक्रूर आणि तो विदुर । दों अक्षरी पार उतरले ।। ४ ।।
हनुमंत दास रामनामें उदास । कळिकाळासी भाष सांगतसे ।। ५ ।।
द्रौपदी सुभद्रा गोपाळ गोपिका बळीभद्र सखा दों अक्षरीं ॥ ६ ॥
नंद तो वसुदेव उग्रसेन राजा । यादव पै पैंजा दों अक्षरीं ॥ ७ ॥
निवृत्ति म्हणे अक्षर दोनी रामनाम । जपतां पावे स्थान वैकुंठीचे ॥ ८ ॥

सरलार्थ:

प्रल्हाद, परिक्षिती, ध्रुव बाळ, म्हणून जे भक्त आहेत त्यांना व उपमन्युस क्षीरसागराची प्राप्ति झाली. ॥ १ ॥ हे सर्व भक्त नामाच्याच बळावर संसार समुद्रातून तरले व हरि या दोन अक्षरानेच त्यांनी कळिकाळा बरोबर दोन हात केले ||२|| तो आत्ममित्र आद्य अंबऋषी – अंबरीष त्यानेही हरि या दोन अक्षरानेच काळाचे माप केले. ॥३॥ तसेच तो उध्दव, अक्रूर आणि विदून हे त्या दोन अक्षरानेच पलिकडे गेले ||४|| दासमारूतीने हि विरक्त होऊन रामनामाने कळिकाळा बरोबर प्रतिज्ञा- घेतली ॥५॥ द्रौपदी, सुभद्रा, गोप आणि गोपिका व तो सखा बळीरामही हरि या दोन अक्षरानेच श्रीकृष्णरूप झाले || ६ || नंद, वसुदेव व राजा उग्रसेनहि आणि यादवांनीहि या दोन अक्षरानेच पैज जिंकली ॥७॥ निवृत्तिनाथ महाराज ती दोन अक्षरे म्हणजे राम अथवा हरि यांचा जप केला असतां वैकुंठाचे ठिकाण प्राप्त होते असे म्हणतात ।।८।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *