२६८ गगनीची तारे वायू वसे सैरा
गगनीची तारे वायू वसे सैरा । गगन गाभारा स्थिर होय ॥ १ ॥
अवचित गगनीं वर्षेपै संपूर्ण । आपणचि पतन तारा पावे ॥ २ ॥
निवृत्ति तारा त्यापरी विचारा । रामनाम धरा तरावया ॥ ३ ॥
सरलार्थ:
नक्षत्र, तारांगणे व स्वैर धावणारा वारा हे सर्व आकाशाच्या पोकळीत शान्त होतात ।।१॥ आकस्मात पुनः ते संपूर्ण आकाशांत वर्षाव करतात. व तारांगणांचा आपोआपच लोप होतो. ॥२॥ निवृत्ति म्हणतात त्या प्रमाणेच रामनाम हेच खरोखर तरण्यासाठी तारक आहे. असा विचार करा. ।। ३ ।।