१६९ द्वैताची ती वाढी अद्वैत मुखडी
द्वैताची ती वाढी अद्वैत मुखडी । नामाची परवडी आम्हांघरीं ।। १ ।।
नाम थोर आम्हां जपूं पैं साचार । विठ्ठल विचार हृदयामाजी ॥ २ ॥
निवृत्ति स्वानंदे विठ्ठलीं आनंद । नित्य परमानंद हृदयामाजी ॥ ३ ॥
सरलार्थ:
द्वैताचा विस्तार व अमृताचा सुकाळ आणि नामाचे प्रकार आमच्या घरी आहेत ॥। १॥ आम्हाला नाम हेच श्रेष्ठ असून आम्ही त्याचाच खरा जप करू सदैव विठ्ठलाचाच विचार आमच्या हृदयामध्ये आहे. ॥२॥ निवृत्तिला स्वानंदस्वरूप विठ्ठलाचा आनंदानुभव नित्य परमानंस्वरूपाने हृदयामध्ये अनुभवास येतो ।।३।।