२७० अचेत आत्मा चेतविला साचा

अचेत आत्मा चेतविला साचा । प्रबोध मनाचा रामनामीं ॥ १ ॥
हें सुख साचार निरंतर सर्वां । एकतत्वी भावीं आचरण ।। २ ।।
निवृत्ति म्हणे आत्मा हाचि पै विठ्ठल । नाहीं बहुसाल कर्मकांड ।। ३ ।।

सरलार्थ:

खरोखर राम नामाच्या ज्ञानाने प्रसुप्त आत्मा जागा झाला ।। १।। हे सत्य सुख सतत सर्वांना त्या एका आत्मतत्त्वाच्या भावाचरणाने होते ॥ २ ॥ श्री निवृत्तिनाथ म्हणतात श्रीहरि विठ्ठल हाच आत्मा आहे. तेथे भरपूर अशा कर्मकांडांची आवश्यकता नाही ||३|| (आत्मा हाच श्रीहरि विठ्ठल आहे) ॥३॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *