०१७ हरिविण व्यर्थ आचार समर्थ

हरिविण व्यर्थ आचार समर्थ ।
हरि हेंचि हेत अरे जना ॥ १ ॥
तें रूप पंढरी पुंडलिकसंगे ।
एका नामें पांग पाश तोडी ॥ २ ॥
सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण ।
वेदमत्तें खुण ऐसी असे ॥ ३ ॥
निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद ।
नाहीं भिन्न भेद विश्वीं इये ॥ ४ ॥

सरलार्थ:

श्रीहरि वांचुन मोठमोठे आचारधर्म निरर्थक आहेत. अरे बाबा श्रीहरी हेच खरे प्रेमाचे स्थान आहे. ।।१।। ते पांडुरंगाचे रूप पंढरित पुंडलिकाच्या संगतीत असून त्याच्या एकमेव नामाने सर्व कष्ट व बंधने तोडून टाकते. ।।२।। तूं सर्व कर्मे ब्रह्मार्पण कर. वेदाच्या मते हेच वर्म आहे. ।।३।। सर्व विश्व गोविंद रूप आहे. हाच निवृत्तिचा देव असून या विश्वात भिन्नता व भेद मुळीच नाही. ।।४।।

भावार्थ:

हे लोक हो हरिविण कोणताही आचार श्रेष्ट नाही. हरिची प्राप्ती हाच समर्थ विचार आहे. त्या विठ्ठल नामाने सर्व पाश सुटतात तो श्री विठ्ठल पंढरीत उभा आहे. आपली सर्व कर्म त्याला अर्पण करावीत हे वेदांचे मत आहे. निवृतिनाथ म्हणतात हा माझा गोविंद भिन्न रुपात भासत असला तरी तो एकत्व रुपाने त्यात आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *