२७१ रूप ध्यावो ध्यानी आईकावे कीर्तनी

रूप ध्यावो ध्यानी आईकावे कीर्तनी । पारणें श्रवणीं नयनाचीये ॥ १ ॥
हृदयीं विठ्ठलु ध्याता निरंतरु । वैकुंठ साचारु प्राणियांसी ॥ २ ॥
अनंत जन्माचें प्रायश्चित हरी । विठ्ठल साजिरी ब्रिदावळी ॥ ३ ॥
निवृत्ति साधन रुप ध्याये ध्यानीं । मनाची उन्मनि हरिचरणीं ॥ ४ ॥

सरलार्थ:

आम्ही आता रूपाचे ध्यान करून व कीर्तनात नाम ऐकून डोळे व कानाचे पारणे सोडू नामरूपाचा उपवास सोडू ||१|| विठ्ठलाचे हृदयामध्ये सतत ध्यान केले असता प्राण्यास खरोखर वैकुंठाची प्राप्ती होते ।।२।। निवृत्ति – प्रसाद श्रीहरि विठ्ठलनामाची सुंदर नामावली ही अनंत जन्माच्या पापाचे प्रायश्चित्त आहे. ||३|| श्रीहरिच्या रूपाचे ध्यान केले असता श्रीहरिच्या पायाजवळ मन हे उन्मन होते. मन हे मनपणाने नाहिसे होते असे श्री निवृत्तिनाथ म्हणतात. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *