२७२ ध्यान धरा हरि विश्रांन्ति नामाची

ध्यान धरा हरि विश्रांन्ति नामाची । विठ्ठलीं साची मनोवृत्ती ॥ १ ॥
ध्यानेविण मन विश्रांतिविण स्थान । सूर्येविण गगन शून्य दिसे ।। २ ।।
नलगे साकार विठ्ठल मनोवृत्ति । प्रपंच समाप्ति ती अक्षरीं ।। ३ ।।
निवृत्ति समता विठ्ठलकीर्तन । करितां अनुदिन मन मेळे ॥ ४ ॥

सरलार्थ:

श्रीविठ्ठलाच्या ठिकाणी सत्यत्वाने मनाची वृत्ति ठेवून श्रीहरिचे ध्यान धरावे व नामाची विश्रांन्ति घ्यावी ।। १ ।। ध्यानावांचुन मन व विश्रांती न वाटणारे स्थान व सूर्यावांचून आकाश हे शुन्यवत दिसते. ।।२।। मनोवृत्तिमध्ये साकार विठ्ठल मूर्तिचीहि गरज नाही केवळ तीन अक्षरी विठ्ठल नामानेच दुःख रूप प्रपंचाची समाप्ति होते ||३|| निवृत्तिनाथ म्हणतात मन लावून समत्व बृद्धिने प्रतिदिन विठ्ठलाचे कीर्तन केले असता जीवन विठ्ठल स्वरूपच होते ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *