२९० सर्व हरि दिसे जनीवनी वसे
सर्व हरि दिसे जनीवनी वसे । भवदृश्य भासे भक्तजनां ।। १ ।।
ऐसें कांही करा सहज तें आचरा । जन्मभरोवरा पडों नका ॥ २ ॥
भावना श्रीधर भाविक हरिहर । भजनीं श्रीधर सर्व तुष्टं ॥ ३ ॥
निवृत्ति निधान आत्मा हा जीवन । भावयुक्त धन पावे पावे ॥ ४ ॥
सरलार्थ:
भक्त जनांना श्रीहरि हा जनावनात दिसतो व दृश्य संसार हा खोटा भासतो ।।१।। असे तुम्हीहि काहीतरी करा व ते सहजच आचरण करा पण जन्म मृत्युच्या फेऱ्यात पुन:पडू नका ।।२।। भावनेने श्रीधर श्रीकृष्ण भाविक भक्त भगवान हरिहर भजनाने रूक्मिणीवर प्रसन्न होतो ||३|| निवृत्तिचा ठेवा हा आत्मजीवनच आहे. भवमुक्तीचे धन भावानेच प्राप्त होते ।।४।।