२९१ परासी परते परनिंदा नको
परासी परते परनिंदा नको । सर्व विष्णु एको हेंचि ब्रह्म ।। १ ।।
याते पैं निदिंता न पवसी अच्युता । हरि हरि म्हणतां उद्धरतीं ॥ २ ॥
जन ब्रह्म हरि यातें झणे निंदीतां । ब्रह्मसाप्युज्यता न पवसि ॥ ३ ॥
निवृत्ति तत्पर सर्व लेखी आप वासना संकल्प रामकृष्ण ॥ ४ ॥
सरलार्थ:
परकेपणा दूर ठेवून परनिंदा करू नये कारण सर्व विष्णु हेच एक परब्रह्म आहे ।।१।। परनिंदा म्हणजे विष्णुचीच निंदा केल्याने त्या अच्युत श्रीहरिची प्राप्ति होणार नाही. ।।२।। आपपर भाव टाकून परनिंदाही घडली नाही तर केवळ हरिहरि या नामानेच तुझा उद्धार होईल. ।।३।। निवृत्ति हा सावधपणे सर्वांठायी आपणास पाहतो. त्याची वासना आणि संकल्प रामकृष्ण रूपच झाले आहेत ।।४।।