२९६ मातृ-पितृ निंदिता द्वैत हेही खोटे

मातृ-पितृ निंदिता द्वैत हेही खोटे । अर्चन गोमटें एका विष्णू ।। १ ।।
निंदिता पितरांसि नपवे हृषीकेशी । योनिचे माळेसि गुंफसील ॥ २ ॥
वित्त शाठ्य करी प्रपंचाचरण । पितृ जनार्दन न पावसी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे नर द्वैताचा पामर । अद्वैती सुरवर नाहीं रया ॥ ४ ॥

सरलार्थ:

माता-पित्यांची निंदा करून द्वैत निर्माण करणे हे वाईट आहे व माता-पिता- गुरू अतिथी एक विष्णुच आहे असे म्हणून पूजन करणे हे चांगले आहे ||१|| माता-पिता यांची निंदा केली असता श्रीहरि ऋषीकेश प्राप्त होणार नाही तर नाना योनींच्या मालिकेत मात्र गुंतावे लागेल ॥२॥ त्यांच्या संपत्तिची चोरी करून प्रपंचाचे आचरण करतो मग सर्व जगत्पिता जनार्दन त्याची प्राप्ति तुला कदापिही होणार नाही. ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात – असा मनुष्य द्वैताने निकृष्ट झाला आहे. त्याला अद्वैतस्वरूप श्री अनंतात स्थान नाही ||४||

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *