३०८ क्षमेचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ती

क्षमेचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ती । अवघी हैं क्षिति एकरूप ॥ १ ।।
शांति दया पैसे क्षमा जयारूप । अवघेंची स्वरूप आत्माराम ।। २ ।।
निंदा द्वेष चेष्टा या अभिमान भाजा । सांडुनिया भजा केशवासीं ॥ ३ ॥
निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्त । अवघींच समस्त गिळियेली ॥ ४॥

सरलार्थ:

शरीररूप क्षेत्राचा विस्तार व त्या शरीरास जाणणाऱ्या क्षेत्रज्ञ आत्म्याची वृत्ति ही सर्वच पृथ्वी एकरूपानेच आहे ।।१।। महानद्या व शांति आणि क्षमा हे ज्याचे रूप आहे त्याचे सर्वच स्वरूप आत्माराम हे आहे ||२|| निंदा, द्वेष, अभिमान व अन्य चेष्टावृत्ति रूप टाकून एका केशवाचे भजन करावे ||३|| निवृत्ति हा एकरूप चित्ताने उभा आहे. व त्याने सर्वच विकार गिळून टाकले आहे. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *