३१८ मी माझे रोकडे केले फाडोवाडे

मी माझे रोकडे केले फाडोवाडे । ब्रह्मांडा एवढे ढिसाळ थोर ।। १ ॥
मी माझे टवाळ अवघाचि गोवाळ । मी तो सोज्वळ ब्रह्मरूपें ।। २ ॥
मीपण नुतरे तूंपणात्वरे । वेगीं विठ्ठल धुरे शरण जाऊं ।। ३ ।।
निवृत्ति म्हणे मीतूपणे सगळा । तुजमाजि गोपाळा रहिवास ॥। ४ ॥

सरलार्थ:

सर्व ब्रह्मांडाला व्यापून टाकणाऱ्या व मोठे पोकळ खोटेच असलेल्या मी व माझेपणाची प्रत्यक्ष स्पष्टता केली ||१|| तेव्हा असे कळून आले की मी व माझे हे खोटे असून सर्वच गोपाळ भरून आहे व मी हे तत्त्वतः सालस असे ब्रह्मच आहे ||२|| मी तू पणा उरतो व तूपणा शिल्लक राहत नाही. याकरितां सर्वाग्रणी अशा विठ्ठलालाच शरण जावे ||३|| निवृत्तिनाथ म्हणतात – मी व तु पणाने सर्व श्रीहरिचाच वास तुझ्यामध्ये आहे ||४||

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *