३२१ दिपाची कळिका दिपिचि सामावे

दिपाची कळिका दिपिचि सामावे । तैसा जीव शिव वोळखीजो ।। १ ।।
दीप आहे देहीं तयाचे हे प्रकाश । त्याचेनि सावकाश हरी भजे रया ।। २ ।।
न मिळे आयुष्य न मिळे घटिका । देह क्षण एका जाईल रया ॥ ३ ॥
निवृत्तिचा दीप दिपाचिये मुसे। आटोनि सौरसे एक जाला ॥ ४ ॥

सरलार्थ:

दिव्याची प्रभा दिव्यातच सामावून जाते तसा जीव हा शिवातच एकरूप होतो असे जाणावे ||१|| तो आत्मदीप देहात असून त्याच्याच द्वारा सावकाश शांतपणे हरिचे भजन कर ||२|| आयुष्यच काय पण घटिका पुनः मिळणार नाही देहहि एका क्षणात जाईल || ३ || निवृत्तिचा आत्मदीप परमात्मदिपाच्या साच्यात वोतला तो आटून आनंदाने एकरूप झाला ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *