३२३ जाणिवेचेनि पैसे वासना हिंडे

जाणिवेचेनि पैसे वासना हिंडे । आनान ब्रह्मांडे शोधिताहे ।। १ ।।
तैसे नको जना निरंतर वासना । वैकुंठ भजना करीजो रया ।। २ ।।
जाणीवनेणीव अवघा श्री अनंत । नेणो उचित हरि भजे ॥ ३ ॥
निवृत्तिचे तट भजन अविनाश । भजनेंचि पाश तुटे रया ॥ ४ ॥

सरलार्थ:

ज्ञानाच्या वाढीने वासना फिरते व ती वेगवेगळी ब्रह्मांडे शोधून काढते ।।१।। अरे जना तसे अखंड वासना नको हरि भजनातच वैकुंठाचे सुख मान किंवा भजनाने सर्व वैकुंठ करून टाक ।। २।। आपली जाणीव व नेणीव, ज्ञान व ज्ञानातीत अवस्था हे सर्व अनंत रूप आहेत नेणीव बाजुला सारून योग्य असे हरिचे भजन कर ||३|| अविनाश हरिचे भजन हेच निवृत्तिचे पैलतीर आहे. अरे राजा भजनानेच भवपाश तुटुन जातात ॥४॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *