३२४ संसार भ्रमे भ्रमले हे जीव

संसार भ्रमे भ्रमले हे जीव । नेणती हे मात्र रोहिणीची ॥ १ ॥
जाईल हा देह सरेल आयुष्य । आपेआप भविष्य उभें राहे ।। २ ।।
वेगु करा आधी रामनाम चितना । जेब नाहीं पाहुणा काळ आला ॥ ३ ॥
सर्वत्र श्रीराम ऐसा करा वाचे । सुटतिल मोहाचे मोहपाश ।। ४ ।।
तिमिरपडळें विभाली पै तुष्टी । प्रपंच सृष्टि दिसतसे ॥ ५ ॥
निवृत्तिचे सार रामकृष्णनाम । बैकुंत परम सर्वकाळ ॥ ६॥

सरलार्थ:

हे सर्व जीव संसारभ्रमाने बेडे झाले आहेत. ते ही माया मृगजळ आहे असे जाणत नाही ||१|| हा नरदेह जाईल व आयुष्यहि संपेल व पुढील भविष्य स्वाभाविकच उभे राहील ॥२॥ जबबर तो काळ पाहुणा आला नाही तोवरच राम चिंतनाची त्वरा करा ॥३॥ सर्व ठिकाणी श्रीराम आहे असे वाचेने म्हणा व मानाहि, त्याने मोहाचे पाश बंधने तुटतील ॥४॥ अज्ञानांधकाराच्या पडद्याने दृष्टि नष्ट झाली व केवळ प्रपंचच दृष्टिला दिसू लागला ।।।५।। रामकृष्णनाम हेच निवृत्तिचे सार आहे. ते नामच सर्वकाल बैकुंठ आहे ॥६॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *