३२८ उन्मनी अवस्था लागली निशाणी

उन्मनी अवस्था लागली निशाणी । तन्मयता ध्यानीं मुनीजना ॥ १ ॥
मन तेथें नाहीं पहासीरे काई । सर्व हरी डोहीं बुडी देका ॥ २ ॥
मनाची कल्पना देहाची भावना । शून्य ते वासना हरिमाजी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे सर्व हरिपीक पिकलें । ज्ञानासीं लाधलें गुरुकृपा ॥४॥

सरलार्थ:

या आत्मज्ञानाने मुनिजनांना उन्मन अवस्थेची खूण प्राप्त झाली. व तिच्या ध्यानाने ते तन्मय एकरूप झाले ॥ १।। अरे बाबा आता तू काय पाहतोस तेथे मन तर राहत नाही तर सर्व हरिस्वरूपच आहे. या बोधाच्या डोहांत बुडी दे ना ||२|| मनाचे संकल्प व देह भावना व वासना त्या हरिमध्ये शून्य – अभावरूप होऊन जातात ।। ३ ।। निवृत्तिनाथ म्हणतात – हे सर्व श्री हरिरूप पीकच पिकले आहे व ते ज्ञानासह गुरुकृपेने लाभले आहे. ॥४॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *