३३१ श्रुतिशास्त्र वेद यांसी नाही भेद

श्रुतिशास्त्र वेद यांसी नाही भेद । भेदवादी द्वंद्व वेगळें पडे ।। १ ।।
वेगळा भाविता वेगळाची होये । ब्रह्मासि न साहे तेथिचा मळ ।। २ ।।
मळेसी वोविळा राहाटी गोंविला । तो कैसा खुंटला बोलों आम्हीं ||३||
निवृत्ति साधन करा हा विश्वास। गुरुविण पाश न तुटती ॥ ४ ॥

सरलार्थ:

उपनिषदे, शास्त्रे व वेद यांच्यात भेदच नाही. मात्र भेदवादी लोक हे द्वैत निर्माण करून वेगळे पडतात ।। १ ।। द्वैताची भावना केली तर द्वैतच होते. मात्र तेथील मळ, ब्रह्मस्वरूपास सहन होत नाही || २ || संसार मालिकेत वोपला गेलेला व जनराहाटी मध्ये सांपडलेला तो आत्मा कसा सुटला हे आम्ही सांगतो ||३|| निवृत्तिनाथ म्हणतात- दुसरे साधन न करता गुरुंच्या वचनावर विश्वास ठेवा कारण गुरुवांचुन ही संसारबंधने तुटणारच नाही. ॥ ४ ॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *