३३२ सर्व हरिब्रह्म वेदादिक मती
सर्व हरिब्रह्म वेदादिक मती । श्रुतिही बोलती तेणें पंथे ॥ १ ॥
ब्रह्मामाजि जयो ब्रह्मांड उदयो । ब्रह्म हे स्वयमेवो आत्माराम ।। २ ।।
शास्त्रें समवाय उपनिषदें गोमती । चैतन्याची श्रुति ब्रह्ममय ||३||
निरूपण सर्व नारायण । हरिविण दिन रिता नाहीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
वेदशास्त्र मते सर्वजगत ब्रह्मरूप आहे. उपनिषदेहि तोच मार्ग सिद्धांत सांगतात ॥ १ ॥ ब्रह्मामध्येच ब्रह्मांडाचा जय आणि उत्कर्ष आहे. ब्रह्म हेच स्वयं आत्माराम आहे ।।२।। शास्त्रे व उपनिषदे सारखेच याचे गान करतात. ब्रह्मस्वरूप चैतन्याचीच सृष्टि आहे ||३|| सर्व नारायण आहे हेच निवृत्तिचे सांगणे आहे व त्या हरिवांचुन दिवस व देशहि रिकामा नाही ॥ ४ ॥