३३५ परिपूर्ण ब्रह्म विज्ञानेसी ज्ञान

परिपूर्ण ब्रह्म विज्ञानेसी ज्ञान । योगियाचें ध्यान आत्मज्योति ।। १ ॥
आत्माराम सार दृश्य द्रष्टा विचार । नाम संकेत धीर निरंतर ।। २ ।।
ध्येयाचे पै ध्यान मनाचें उन्मन । भक्तांसीं पावन वैकुंठींचे ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे भक्ता स्वानंद जीवन । ब्रह्म सनातन सर्वांघटीं ॥ ४ ॥

सरलार्थ:

सर्वविश्व हे परिपूर्ण ब्रह्म असून त्याच्या अनुभवासह ज्ञान हिच आत्मज्योत योगीजनांचे ध्यान आहे ।। १ ।। (सर्व विश्व विष्णुरूप आहे हेच ज्ञानरूप ध्यान योगी करतात.) दिसणाऱ्या देहादि संसारात आत्माराम हेच सार असून दृश्य द्रष्टा हा द्वैतविचार तेथे दूर झाला आहे. व एक नाम संकेताचा नित्य निर्धार त्यांनी केला आहे.।।२।। ध्येय ध्यान रूप व मन हे उन्मन स्वरूप हेच भक्त जनांचे पवित्र वैकुंठ आहे || ३ || श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात हे सनातन शाश्वत ब्रह्म सर्व भूतमात्री असून तेच भक्तजनांचे स्वानंदजीवन आहे. ॥ ४ ॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *