३३७ देहाची दिवटी अखंड सतेज
देहाची दिवटी अखंड सतेज । चंद्रसूर्य भोज नाहीं तेथें ॥। १ ।।
नाहीं तेथें रवि नाहीं तेथें चंद्र । अवघाचि महेंद्र एकातत्त्वें ॥ २ ॥
दीपकेंचि दीपक विस्तार अनेक । अवघाचि त्रैलोक्य एकतत्त्वें ॥ ३ ॥
निवृत्ति संपन्न एकतत्त्व सेवी । सर्वत्र गोसावी दिसे आम्हां ॥ ४ ॥
सरलार्थ:
देहातच असलेल्या नित्य तेजस्वरूप दिव्यापुढे चंद्र सूर्याचे कौतुक कांहीच नाही ।।१।। तेथे सूर्य व चंद्र नाही तर संपूर्ण महान इंद्र असा श्रीहरिच एकतत्त्वाने भरलेला आहे. ।।२।। दिव्यानेच दिवा लावावा असा अनेक रूपाने तो विस्तार पावला आहे. तो सर्वत्र त्र्यैलोक्य एकतत्त्वाने विलसत आहे. या अनुभवाने संपन्न असलेला निवृत्ति त्या एकतत्त्वाचे सेवन करीत आहे. आम्हाला तो त्रैलोक्यमालकच आता दिसत आहे ॥ ४ ॥