३३८ व्यर्थ हा प्रपंच विस्तारला साचा

व्यर्थ हा प्रपंच विस्तारला साचा । पाहाता आहाच फुकट रया ।। १ ॥
सर्व घटीं हरि क्षरोनियां घरीं । वैकुंठ कामारी भोगीतुसे ।। २ ।।
यासी नाहीं द्वैत आपणचि अद्वैत । सर्वरुपीं समता एकातत्त्वें ।। ३ ।।
निवृत्ति प्रतिमा यत्रयेसा व्योमा । प्रपंच गरिमा नाहीं तेथें ॥ ४ ॥

सरलार्थ:

अरे राजा हा प्रपंच सत्य म्हणून खोटाच वाढत गेला आहे. विचार केला असता हा वरवरचा मोलरहितच आहे ॥ १ ॥ मात्रामध्ये हा हरि सर्वामध्ये व्यापून वैकुंठस्वरूप काम करणारा होऊन भोगत आहे ।।२।। याला द्वैत नसून आपणच तो अद्वैत स्वरूप आहे. सर्व रूपवान वस्तुमध्ये तो एकरुपाने सम्मत-सारखाच आहे.।।३।। निवृत्तिची प्रतिमा आकाशाच्याहि पलिकडची असून तेथे प्रपंचाचा मोठेपणा चालत नाही ||४||

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *