३४१ काया हे ब्रह्मांड ठसावले पिंड

काया हे ब्रह्मांड ठसावले पिंड । जीव जीवनीं अंड एका तत्त्वें ॥। १ ।।
आत्मा हा चराचरीं व्यापक कुसरी । एक निर्धारी क्षरलासे ।। २ ।।
घटमठ व्यापिले आपेआप संचले । कल्पने बुडालें संकल्प रया ||३||
निवृत्तिचें निराळ जीवन पै सकळ । प्रत्यक्ष गोपाळ दिठीं दिसे ॥ ४ ॥

सरलार्थ:

आपला देह हा ब्रह्मांडच पिंडरूपाने मूर्त झाला आहे. (म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी व ब्रह्मांडी ते पिंडी अशी म्हण प्रचलित आहे. ब्रह्मांडच पिंड – देह झाले. एकतत्त्वानेच जीव हा आकार जीवनाच्या रूपाने घेतला एक आत्मतत्त्वच जीवनदशेला आले || १ || “एक हरि आत्मा जीव शिव समा”) हा एकच आत्मा आपल्या कौशल्याने चराचरात व्यापक झाला व तोच पुढे पुन: एकतत्त्वाच्या निश्चयाने एकरूप झाला ।।२।। अरे राजा त्या एकतत्त्वानेच सर्व घटमठ व्यापून स्वाभाविकच सर्वात कोंदून भरला त्यामुळे नानात्वाचे कल्पनेचे संकल्प नाहिसे झाले ||३|| निवृत्तिचे सर्व जीवन (स्वावलंबी) निराकार आकाशा सारखे खरे पण प्रत्येक घराच्या रूपाने मात्र तो गोपाळ परमात्मा साकार दिसू लागला ॥४॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *