३४२ विनट विठ्ठला प्रकृती अबोला

विनट विठ्ठला प्रकृती अबोला । सतत संचला नेणों हरि ।। १ ।।
मोहें वेटाळला पाहे चहूंकडे । प्रपंच गडबडे लोळतुसे ।। २ ।।
निवृत्ति देवीं प्रपंचु पै सोडीला । प्रकृति अबोला ब्रह्मडोहीं ।। ३ ।।

सरलार्थ:

सुशोभित अशा विठ्ठलाचा प्रकृतिशी अबोला – संबंधच नाही. तो श्रीहरि सतत व्यापलेला असून प्रकृतिस जाणतच नाही || १ || मोहाने गुंडाळून तो सर्व बाजूस पाहतो तेव्हा प्रपंच गडबडा लोळतो. नाहीसा होतो ॥२॥ निवृत्ति देवाने प्रपंच सोडला व ब्रह्मडोहात स्वरूपांत बुडी दिल्याने त्याचाहि प्रकृतिसी संबंध तुटला ।।३।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *