२४७ एकेविण दुजे तत्त्व नाही पै सृष्टी

एकेविण दुजे तत्त्व नाही पै सृष्टी। विश्वरुपें भेटी अर्जुनासी ॥ १ ॥
त्या रुपें वेधिले काय करु सये। एक रुप होय कृष्णराजा ॥ २ ॥
न दिसे पै द्वैत अद्वैत श्रीहरि । अवघा घरोघरीं हरि नांदे ।। ३ ।।
निवृत्ति परिवार एकतत्त्व दिवटा । एक्यारुपें वैकुंठा नेतु आम्हां ॥४॥

सरलार्थ:

या सृष्टित एका वाचुन दुसरे तत्त्वच-वस्तुच नाही. अर्जुनास विश्वरूपाने भेट देवून हेच सिद्ध केले आहे ॥ १।। अग सखे त्याच रूपाने मला वेड लावले आहे याला मी काय करू तो श्रीकृष्णराज एकी एक आहे || २ || द्वैताचा निरास होऊन अद्वैतरूप श्रीहरि सर्व घराघरांत वस्तुमात्रांत नांदत आहे ।।३।। निवृत्तिच्या सर्व गुरूशिष्य परिवारांत हे एकत्व दर्शन हा दिवा असून या एकरूपातच तो आम्हाला वैकुंठात नेतो ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *