३५० आकार निढळी साकार मंडळी
आकार निढळी साकार मंडळी । एकु वनमाळी क्षरलासे ।। १ ।।
पंच ब्रह्मछाया पंच ब्रह्मछाया। एक जाये विलया एका संगे ।। २ ।।
ऐसिये तत्त्वें होताती परत्वें । धरुनियां सत्व आहेभावें ।। ३ ।।
निवृत्ति दिवटा उमगूनीयां वाटा। पंढरी चोहटा देखिला हरि ॥ ४ ॥
सरलार्थ:
निरामय – निराकारात आकार व प्रांत प्रदेशात एक परमात्माच साकार झाला आहे. ।। १ ।। पंचमहाभूतहि एका ब्रह्माचाच आभास व माया असून एक एकामुळे विलीन होतात ।। २।। अशीहि पंचतत्त्वे परब्रह्म रूप होतात. हाच सत्यभाव आम्ही धरून आहोत ||३|| निवृत्तिने या दिव्याद्वारा वाट समजावून घेतली व पंढरिच्या चौकांत तो श्रीहरि पाहिला ॥ ४ ॥