श्री गुरु निवृत्तिनाथांची आरती

निवृत्तिनाथ स्मरणे सुख शांती पावलो ।
निर्विकार स्वयंभू ज्योति हृदयी पाहिलो ||१||
आरती ओवाळीन श्रीगुरू निवृत्ति चरण ।
अविनाश परब्रह्म शिव अवतारपूर्ण ।।
आरती ओवाळीन ॥धृ.॥

नवविधा नवभक्ति उजळोनी आरती ।
निवृत्ति मुगुटमणि ज्ञान पाजळल्या ज्योति ॥
आरती ओवाळीन ॥ २ ॥

ब्रह्मगिरी त्रिकुटासनी अविनाश समाधी ।
उन्मनी साधियेली सांडुनिया उपाधी ।।
आरती ओवाळीन ।। ३ ।।

आगमनिगमांसी तुमचा न कळेची पार ।
तुमच्या दर्शनमात्रे उद्धरती नारी नर ||
आरती ओवाळीन ॥४॥

निवृत्ति निगमता चिंतामणी निरंतर ।
ज्ञानदेव तेथे उभे दोन्ही जोडोनी कर ॥५॥
आरती ओवाळीन ॥

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *