३५९. निराकार वस्तु आकारासि आली
३५९. निराकार वस्तु आकारासि आली । विश्रांति पैं जाली भक्तजनां ॥ १ ॥
भिवरासंगमी निरंतर समी । तल्लीनता ब्रह्मी उभी असे ।। २ ।।
पुंडलिक ध्याये पुढत पुढती सोये। विठ्ठल हेंचि गाये संकीर्तनी ॥ ३ ॥
निवृत्तिसंकीर्तन ब्रह्म हें सोज्वळ । नाम हें रसाळ अनिर्वाच्य ॥ ४ ॥