३६०. जेथें नाही मोल मापाची गणना
जेथें नाही मोल मापाची गणना । आपण येसणा ब्रह्मघडु ॥ १ ॥
तें रूप साजिरें निर्गुण साकार । देवकी बिढार सेवियेलें ॥ २ ॥
न संपडे ध्याना मना अगोचर । तो गोषवेषधर गोकुळींरया ॥ ३ ॥
निवृत्ति धर्मपाठ गयनि विनट । कृष्णनामें पाठ नित्य वाचा ॥४॥